Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
आपला सण इतका स्वस्त नाही रे भाऊ !!!
संकीर्ण लेख

आपला सण इतका स्वस्त नाही रे भाऊ !!!

diwali 1'सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे' किंवा 'मराठी आपली संस्कृती मराठी आपला बाणा' किंवा 'सण दिवाळीचा मोठा नाही आनंदा तोटा' अशा पंक्तीने सुरु होणारे निदान ४-५ मेसेज तरी प्रत्येक सणाला माझ्या इन बॉक्स मध्ये येउन पडतात. त्याची पहिली ओळ वाचल्यावरच पुढील मेसेजचा अंदाज येतो त्यामुळे नजर आपोआपच शेवटच्या ओळीकडे जाते. प्रत्येक क्षणाला फेसबुक वर किमान १० जणांनी तरी सणाशी संबंधित एखादा फोटो काढून पन्नास जणांना tag केलेले असते. कुणाला हव्या आहेत अशा सार्वजनिक शुभेच्छा ?कुणाच्या लक्षात तरी राहतात का तुमच्या शुभेच्छा ?सोशल नेट्वर्किंगच्या जाळ्यात अडकलेले आपण अशा शुभेच्छा 'आपण फक्त समाजाशी बांधील आहोत' असे स्वत:लाच समाधान मिळावे म्हणून करत असतो. whatsapp वर एक मेसेज टाकला किंवा फोटो पाठवला कि आपली जवाबदारी संपली? आपण ज्यांना मेसेज किंवा फोटो पाठवतो त्या प्रत्येकाशी आपले नाते चांगले आहे का ? आणि जर तेवढे चांगले आहे तर मग आपण त्यांना प्रत्यक्ष भेटू का नाही शकत ? जर लांब राहत असतील तर एखादा फोन तरी करू शकतो.
या सोशल नेट्वर्किंगच्या विळख्याने आपल्याला आपल्या खऱ्या सोशल नेटवर्क पासून दूर ठेवले आहे . एरव्ही रस्त्यात पाहून हसू हि न शकणारा मित्र (?) whatsapp वर दिवाळी च्या दोन दिवस आधी 'Happy Diwali In Advance Bro' असा मेसेज पाठवतो .तेंव्हाच कळून येते कि आपल्याला सणाचे किती महत्व आहे. त्यात भरीस भर म्हणून दिवाळीच्या प्रत्येक दिवशी एक मेसेज येतो Happy Dhanteras , Happy Laxmipujan, Happy Bhaubij.... Android मोबाईल घेऊ शकणाऱ्या व्यक्तीकडे आपल्या अप्तेष्ठाना , मित्रांना एक फोन करून शुभेच्छा देऊ न शकण्याइतके दारिद्य्र आले आहे का ?
असो हे सर्व न संपण्या इतके आहे. त्यामुळे मी या पुढे अशा शुभेच्छा देणे बंद करत आहे. फक्त एवढीच विनंती करू इच्छितो कि कृपया या आणि इतर कोणत्याही सणाला फेसबुक वर फोटोजना tag करू नका तसेच wahatsapp आणि इतर कोणत्याही माध्यमातून घासून घासून गुळगुळीत झालेले मेसेजेस पाठवू नये.
या सणाला आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रांना प्रत्यक्ष जाऊन भेटा जर जमणार नसेल तर फोन करणे इतके महाग नाही. आणि सहमत नसाल तर तुमचे मत comment Box मध्ये टाका.

धन्यवाद !

- अभिजीत इंजल

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla