" खादयसंस्कृती अस्सल मुंबईकरांची .....अस्सल मुंबईची"

रुचीपालट

हिरण्यकश्यपूपुढे छाती काढून उभं रहावं असं अवाढव्य महाराष्ट्राच्या पोटातून बाहेर आलेल हे चिमुरडं शहर मुंबई ! या मुंबईला लाभलेल्या अनेक वरदानांपैकी एक म्हणजे या मुंबईचे चोखंदळ खवैय्ये मुंबईकर!

या आपल्या मुंबईने प्रत्येक प्रांतातलं वेगळेपण, वैशिष्टय आपल्यात सामावून घेतलयं, दक्षिणेकडला इडली डोसा आणि उत्तरेकडली समोसा कचोरी आपली मानलीयं; पण तरीही पुणेरी मिसळ, खमंग थालीपीठ, साबुदाणा खिचडी यांच वेगळेपण तेवढयाच प्रेमाने आपल वैशिष्टय म्हणून जपलयं.

सगळीकडचं चांगल उत्तम ते घेऊन त्यात आपली भर घालून एक रूचकर अन वेगळी अशी स्वत:ची खादयसंस्कृती तयार करण्याचं काम करायला इथल्या चोखंदळ मुंबई करांनी खूप पूर्वीपासूनच सुरूवात केलीय.

म्हणूनच आम्ही आणले आहेत काही मुंबईकर शैलीतले पदार्थ खास तुमच्यासाठी!

बटाटे वडा:
साहित्य : ४ बटाटे , १ इंच आलं, ७-८ मिरच्या, ७-८ लसूण, मीठ, डाळीचे पीठ, हळद, खायचा सोडा , हिंग, मोहरी

कृती:
बटाटे चांगले उकडून घ्यावेत. आलं, लसूण, मिरची बारीक वाटावे. नंतर एका भांड्यात फोडणी करावी , त्यात थोडे गोडे तेल टाकावे व वाटलेले वाटण टाकावे.त्यात बटाटे , मीठ हळद टाकून चांगले परतावे. नंतर थंड झाल्यावर त्याचे गोळे करावेत. डाळीच्या पिठात हळद,मीठ,खायचा सोडा घालून पीठ घट्टसर भिजवावे.एका कढईत तेल टाकावे.ते चांगले तापले की एक एक वडे पिठात बुचकळून तेलात सोडावे.याच्याबरोबर खाण्यासाठी सुक्या खोबऱ्याची चटणी करावी.पावभाजी :

साहित्य : फ्लॉवर, सिमला मिरची, टोमाटो,कांदा, बटाटा , पावभाजी मसाला, गरम मसाला, मीठ अमूल, बटर १ पाकीट , टोमाटो प्युरी, थोडे लाल तिखट, थोडे धणे, जिरे पूड, काळी मिरी पावडर.

कृती :
सर्व भाज्या बारीक चिरून वाफ लावून घ्याव्यात, नंतर अमूल बटर टाकून त्यात बारीक चिरलेला टोमाटो टाकावा व टोमाटो प्युरी टाकावी.मग त्यात सर्व भाज्या टाकाव्यात व मीठ तिखट धणे जिरे पूड , मिरी पावडर टाकावी, भाजी चांगली घाटत रहावी. भाजी झाल्यावर पाव मधे कापून अमूल बटर लावून फ्राय पन वर भाजून भाजीबरोबर खावेत.

भेळपुरी :

साहित्य : ३ वाट्या चुरमुरे , १०० ग्राम बारीक १ नंबर शेव, लिंबू किंवा कैरी, ३ मोठे कांदे , २ मोठे बटाटे, २ टोमाटो, थोड्या कडक पुऱ्या, तिखट चटणी , गोड चटणी, मीठ चवीनुसार, बारीक चिरलेली कोथिंबीर.
गोड चटणी साहित्य :
११ ग्राम खजूर, थोडी चिंच, गुळ व मीठ चवीनुसार

कृती :


खजुरातील बी काढून टाकावी ,नंतर गुळ बारीक चिरावा, व चिंचेचा कोळ काढून घ्यावा, खजूर मिक्सर मधे वाटून घ्यावे, त्यात गुळ, चिंचेला कोळ व मीठ टाकून चटणी पातळ करून घ्यावी.

तिखट चटणी:
५-६ हिरव्या मिरच्या, थोडा पुदिना, थोडी कोथिंबीर, मीठ चवीनुसार

कृती :
मिरच्या ,पुदिना , कोथिंबीरहे सर्व एकत्र करून त्यात मीठ घालून मिक्सर मधे वाटावे.नंतर त्यात आणखी पाणी घालून पातळ चटणी करावी.

भेळ कृती:
एका भांड्यात चुरमुरे, बारीक चिरलेला बटाटा, कांदा, टोमाटो, कैरीचे बारीक तुकडे, मीठ , कुस्करलेल्या कडक पुऱ्या एकत्र घ्याव्यात, त्यात तिखट व गोड चटणी टाकावी, मग सगळे एकत्र करावे, मग त्यावर बारीक शेव व कोथिंबीर टाकावी. भेळ तयार !

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla