अर्थजगत
Finance

आर्थिक नियोजन तुमच्या  हाती......

 

मुलांसाठी गुंतवणूक

मुलांच्या नित्य नव्या खर्चाने तुमचं घरगुती बजेट कोलमडू शकत.अशा वेळी योग्य ठिकाणी गुंतवलेला पैसाच तुम्हाला या संकटातून बाहेर काढू शकतो.नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच व्यवस्थित बजेट आखून योग्य पर्यायांमध्ये गुंतवणूक केलीत तर भविष्यात याचा खूप फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीचे काही पर्याय पुढील प्रमाणे ....

 

 

१.सुरक्षित पर्याय :

बँकेतील व पोस्टातील ठेवी, पीपीएफ, एनएससी, बचत खाते हे गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय आहेत. या पर्यायांमध्ये परतावा ८ ते १० टक्के मिळतो.पण मागील काही वर्षात महागाई १० टक्क्यांच्या आसपास आहे.त्यामुळे खरा परतावा जवळजवळ शून्य राहतो. याचा अर्थ असा नाही की या पर्यायांकडे आपण दुर्लक्ष कराव.आपल्या गुंतवणुकीच्या नियोजनात सुरक्षित पर्याय पण हवेतच.५० टक्के रक्कम ही कायम सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवावी. हे पर्याय कायम आपली ढाल म्हणून वापरावेत.
 
२.इन्शुरन्स आणि मेडिक्लेम  :

यांच्याकडे परताव्याच्या दृष्टीकोनातून न बघता गरजेच्या दृष्टीकोनातून बघण गरजेच आहे. आपल्याला समजेल व क्लेम नीट मिळेल अशाच योजनेत गुंतवणूक करावी.
 
३.म्युच्युअल फंड्स :

एसआयपी (सिस्टीमेंटिक इन्वेस्टमेंट प्लान) म्हणजे नियमित गुंतवणूक करण्याचा सुरक्षित व फायदेशीर पर्याय.यामध्ये तीन वर्षांचा कालावधी दिला तर उत्तम परतावा मिळतो.गुंतवणूक पण सहज सोपी आहे. तसच मासिक ५०० रुपयांपासून ही गुंतवणूक करता येते.म्युच्युअल फंडामध्ये इतरही अनेक पर्याय आहेत. डेट फंड, सेक्टर फंड, शेअर मार्केट मध्ये ही सरळ गुंतवणूक न करता म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून चांगला परतावा मिळू शकेल.
 
४. शेअर मार्केट :

सध्या मार्केट खाली असल्याने चांगल्या कंपन्यांचे शेअर्स उत्तम दारात मिळत आहेत. शेअर मार्केट मध्ये टप्या टप्यात लहान गुंतवणूक मोठ्या कालावधीसाठी करावी म्हणजे उत्तम परतावा मिळतो. डे ट्रेडिंग अथवा डेरीवेटीवज च्या फंदात पडू नये.
 
५.सोने चांदी:

शतकानुशतकं चालत आलेला हा गुंतवणूक प्रकार आहे. तो अगदी खात्रीचा आहे. इटीएफ , आणि म्युचुअल फंडामार्फतही यात गुंतवणूक करता येते.

६. रियल इस्टेट:

 ओपन प्लॉट , कमर्शियल प्रॉपरटी ,रेसिडेनशियाल  प्रॉपरटी इ. फायदेशीर पर्याय आहेत. जागेचे भाव व बांधकाम खर्च दोन्ही वाढत असल्याने तयार घरात गुंतवणूक फायदेशीर ठरते.बँकेच्या कर्जावरील मासिक हफ्ता ही आपली सक्तीची बचत ठरते.आणि बँकेच्या कर्जामुळे आयकर सवलतही मिळते.
 
गुंतवणूक पर्याय कोणताही असो , योग्य अभ्यास , तज्ञांचे मार्गदर्शन यामुळे व्यवस्थित गुंतवणूक करून भविष्य सुरक्षित करायला नक्कीच मदत होईल.
 

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla