अर्थसंस्कार - २
अर्थ लेख

अर्थसंस्कार- २

आशिष स्वप्न पडून दचकून उठला. पल्लवी शेजारी शांत झोपली होती. तिच्या शेजारी छोटा ओम गाढ झोपेत होता. स्वप्नात आशिषला आपल्या गाडीचा अपघात झाल्याचे दिसते. तेंव्हाची वाटलेली भीती त्याला अजून जाणवत होती. घामाने पाठ ओली झाली होती. भिंतीवरच्या घड्याळाची टिकटिक ऐकून त्याला हायसं वाटलं.आपण नसलो तर ओमच शिक्षण ,घराच्या कर्जाचा EMI , हा घरखर्च या महागाईच्या काळात ..... हे सगळ जमेल एकट्या पल्लवीला ? लग्न झाल्यापासून आपण किती plan केले  आहेत. मोठ घर, गाडी, मुलाला उत्कृष्ठ शिक्षण व परदेशात उच्च शिक्षण, परदेश दौरा, जमलंच तर फार्म हाउस, इतक करूनही रिटायरमेंटनंतर हातात येणारी भक्कम पेन्शन वगैरे वगैरे ...... लिस्ट तर संपतच नव्हती.आशिष मनातल्या मनात हिशोब करू लागला. आपला आत्ताचा पगार , पल्लवीचा पगार income side ला हे दोनच sources दिसत होते. आणि expense side ला ही भली मोठी लिस्ट.जरी मिळणाऱ्या पगारात नुसतं व्यवस्थित नव्हे तर उत्तम तर्हेने रहाता येत होते तरी जर मीच नसेन तर काय ? मोसलोच्या pyramid च्या दुसऱ्या टप्प्यावर तो अडकला. अन्न , वस्त्र , निवारा या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्या तरी सुरक्षेच काय? इथे या गरजांच्या पूर्ततेची सुरक्षा महत्वाची वाटू लागली. गरजा आणि चैन यातील सीमारेषा पुसट झाल्या

वर त्या सगळ्याच्या सुरक्षेची गरज जास्त.त्याने पल्लवीला सांगण्यासाठी त्याला महत्वाच्या वाटणाऱ्या आणि खर्चिक असणाऱ्या गोष्टींची यादी बनवायला सुरुवात केली.
housing  loan  = ४० लाख
दरमहा घरखर्च ५००००/- असेल तर  , ८% दराने दरमहा ५००००/- मिळवण्यासाठी = ७५ लाख   
आणखी १० वर्षांनी ओमच्या शिक्षणासाठी लागणारे पैसे = २५ लाख
महागाई पकडून रिटायरमेंटनंतर लागणारा corpus =  २,४०,००००० /- (दोन करोड चाळीस लाख)
हे सगळं सुरक्षित ठेवायचं असेल तर या सगळ्याचा विमा काढणे याला पर्याय नाही.आशिष आवक झाला.भले यातील
रिटायरमेंट corpus साठी विम्याचा  विचार नाही केला तरी एक करोड चाळीस लाख एवढा विमा तरी घ्यायलाच हवा.अरेच्च्या लाख मोलाचा जीव असं म्हणताना आता महागाईमुळे आपली किंमत पण वाढून कोटीच्या घरात गेली म्हणायची. आशिषला त्या परिस्थितीतही हसू फुटलं.

बापरे , पण आपल्याकडे फक्त ५ लाखाचा इन्शुरन्स आहे. उरलेला insurance जर तातडीने करायचा असेल तर त्याचा हफ्ता किती येईल ? एवढा हफ्ता जमेल आत्ताच्या खर्चात ? अनेक प्रश्न त्याच्या समोर उभे ठाकले . पण त्याच्या मनाने कौल दिला. जेवढा जमेल तेवढ्या हफ्त्यापासून सुरुवात करायची. आणि हळू हळू insurance  वाढवायचा. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं कितीही महाग असली तरी आपण घेतोच ना ..... साधी  blood pressure ची गोळी रोज ८/९ रुपयाला पडते. शिवाय  सटर फटर खर्च ...... cable  चा खर्च ६०० /- रुपये महिना. रोजचा टपरीवर चहा तरी ६००/- रुपये महिना, हॉटेल मध्ये जेवायला गेलो बायकोमुलाला घेऊन तर कमीत कमी हजार रुपये, गाडीसाठी पेट्रोल महिन्याला १०,००० /- रुपये ..... डोकं   भणभणायला लागलं. पण काहीतरी उमगल्यासारखही वाटू लागलं.या सगळ्या चैनीच्या गोष्टींसाठी आपण सहजी खर्च करतो तर स्वतःच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी खर्च केलाच पाहिजे.
झालेल्या साक्षात्काराने त्याने देवाला हात जोडले आणि मनावरच दडपण L. I.C. च्या खांद्यावर टाकायचं ठरवून तो निश्चिंत झाला.
तर मंडळी , आशिष सारखा हिशोब आपण सर्वांनीच करून बघितला पाहिजे. त्या हिशोबाच्या Accuracy  साठी तज्ञांची  मदत घेतली पाहिजे.  L.I.C. चे वेगवेगळे  Plans आहेत, जे आपल्याला यासाठी उपयोगी ठरू शकतात.आपल्या गरजे नुसार आपण अनेक Combinations सुद्धा करू शकतो. लवकरच  L .I .C . च्या plans ची आणि वेगवेगळ्या  Combinations ची आपण माहिती करून घेऊ.

-सौ.जान्हवी मनोज साठे
Investment & Insurance Consultant
9820438968

संबधित लेख-१. आर्थिक नियोजन तुमच्या  हाती......
२.'अर्थसंस्कार'

 

तुमचे काही अभिप्राय व सूचना किंवा आमच्या सदरांबद्दल अधिक माहिती तुमच्याकडे असेल तर त्याचे सदैव स्वागतच असेल.
संपर्क  :Email :
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla