संत्र्याच्या विविध रेसिपीज …
खाऊगल्ली लेख

संत्र्याच्या विविध रेसिपीज …

संत्र हे फळ दोन हंगामात येतं.संत्र्यात लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. संत्र्याने रक्तवृद्धी होते. अशा बहुगुणी नारंगीच्या या वेगळ्या रेसिपीज् यावेळच्या फूड कोर्ट मध्ये … 
 
 
संत्र्याचे पुडिंग
orange puddingसाहित्य :- कस्टर्ड  पावडर ६ चमचे  ऑरेंज  फ्लेवर , साखर ६ चमचे , साखर ४ चमचे केरेमलसाठी  , अगर -अगर ६ चमचे , दुध ५ कप . सजावटी साठी ताज्या संत्र्यांचा गर  .
कृती :-
दीड कप पाण्यात अगर अगरचे तुकडे भिजवून एक तासाने मंद ग्यासवर विरघळून घ्या . ४ चमचे साखर व २ चमचे पाणी पुडिंग मोल्डमध्ये घालून मंद ग्यासवर साखर हलकी तपकिरी होईपर्यंत ठेवून  पूर्ण मोल्डमध्ये पसरवून  बाजूला ठेवा .
ऑरेंज  जम व साखर ६ चमचे मंद ग्यासवर साखर विरघळेपर्यंत ठेवा . अर्धा कप थंड दुधात कस्टर्ड  पावडर मिक्स करून घ्या . उरलेले दुध उकळत ठेवून उकळी फुटल्यावर कस्टर्ड करून घ्या . थोडे घट्ट झाले कि उतरवा . त्यात अगर अगर चे मिश्रण घालून २ मिनिटे उकळवा . थोडे थंड झाल्यावर  जॅम  व साखर घालून मोल्डमध्ये ओता . सेट होईपर्यंत फ्रीजमध्ये ठेवा . नंतर प्लेटमध्ये उपडे करून वरून आवडत असल्यास संत्र्याच्या गराने सजवून सर्व करा . 

संत्र्याची जेली
८ संत्र्याचा गर , गराच्या  पाऊण  पट  साखर ,
कृती :- संत्री सोलून फोडीतून बिया काढा . त्याला एक कप पाणी घालून उकळायला ठेवावे . रसात साखर घालून ग्यासवर ठेवावे . जाडसर झाले कि उतरवावे .

संत्र्याची बर्फी
santra barfiसाहित्य : संत्र्याचा गर २ वाटी, साखर १ वाटी, मिल्क पावडर १ वाटी, संत्र्याचा इसेन्स अर्धा चमचा, रंग पाव चमचा.
कृती : संत्र्याच्या गरात साखर घालून त्याचे पाणी आटेस्तोवर घट्ट शिजवून घ्या. नंतर यात इसेंस व रंग घाला. मिश्रण थंड झाल्यावर त्यात मिल्क पावडर घाला. नंतर हे मिश्रण एकत्र करून एका थाळीत पसरवा व त्याच्या वडय़ा कापून खायला द्या.

 

- Team mumbaipuneonline.com

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla