ब्रेडची भजी
खाऊगल्ली लेख

ब्रेडची भजी

bread-pakodaसाहित्य : एक मध्यम स्लाइस ब्रेड, दोन वाट्या बेसन पीठ ,दोन टे.स्पून तांदळाचे पीठ,दीडवाटी झणझणीत तिखट अशी बटाट्याची स्मॅश केलेली भाजी(भाजी तळल्यावर तिखटपणा कमीहोतो) , चवीनुसार मीठ,मीठ, हिंग,हळद,जिरे पूड व बारीक चिरलेली कोथिंबीर ,तळणीसाठी कढई व तेल.
कृती : प्रथम एका बाउलमध्ये बेसन व तांदळाचे पीठ घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ, हळद, हिंग ,जिरे पूड व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. त्यात जरुरीप्रमाणे थोडेथोडे पाणी घालावे. मात्र भज्यासाठी असावे तसे पीठ जाडसर राहील, याची काळजी घ्यावी. गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवावे व तेल चांगलेकडकडीत तापल्यावरच त्यात ब्रेडच्या कडाकाढून टाकून त्रिकोणी अगर चौकोनी तुकडे कापून घेऊन एका तुकड्यावर स्मॅश केलेलीबटाट्याची भाजी लावावी व त्याचेवर दूसरा तुकडा ठेऊन भिजवलेल्या पिठामध्ये बुडवून घेऊन भज्यासारखे तळूनघ्यावे. ही पावाची भजी हिरव्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस सोबत खाण्यास द्यावी.

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla