शैक्षणिक बातम्या
|
Saturday, 20 July 2013 07:16 |
साठ्ये महाविद्यालयात पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण - MCJ
बहुप्रतिक्षीत अशा MCJ ची परवानगी साठये महाविद्यालयाला मिळालीये . मुंबई मधून पहिल्यांदाच मराठी माध्यमातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण या निमित्ताने विद्यार्थ्याना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून सकाळी नऊ ते दुपारी दोन या दरम्यान प्रवेश अर्ज साठये महाविद्यालयात उपलब्ध आहेत. कोणत्याही शाखेतून पदवीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना MCJ ला प्रवेश घेणे शक्य आहे. माध्यम क्षेत्रात कार्य करण्यास सज्ज होण्यासाठी ही सुवर्णसंधीच आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ३१ जुलै पर्यंत उपरोक्त वेळेत संपर्क साधावा.
|