Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
मुंबईकरांचा ‘शाडूगणेश’
विशेष बातम्या
Wednesday, 20 August 2014 04:32

मुंबईकरांचा ‘शाडूगणेश’

पर्यावरणरक्षणासाठी सुरू झालेल्या शाडूच्या मातीच्या गणेशमूर्तींच्या प्रसाराला आता चांगले यश येत असल्याचे चित्र आहे. गणेशोत्सव समन्वय समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी अंदाजे ३० हजार शाडूच्या गणेशमूर्तीच्या प्र​तिष्ठापना मुंबईत झाली होती. यंदा हाच आकडा २० हजारांनी वाढला आहे. विशेष म्हणजे, अनेक सार्वजनिक मंडळांनीही समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत पूजेसाठी शाडूची गणेशमूर्ती ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवडी मध्य विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची म्हणजेच शिवडीच्या राजाची गणेशमूर्ती १० फूट उंचीची असते. पण मंडळाने पूजेच्या ठिकाणी यंदा प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी शाडूच्या मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. 'पर्यावरण रक्षणासाठी हा आमचा छोटा प्रयत्न आहे. भविष्यात चांगले पर्याय निर्माण झाल्यास मोठी मूर्तीही इकोफ्रेंडसी करण्याचे आम्ही ठरवले आहे,' असे मंडळाचे अध्यक्ष विजय इंदूलकर यांनी सांगितले. पालनजी रतनजी चाळ सार्व. गणेशोत्सव मंडळानेही हाच कित्ता गिरवत पूजेसाठी शाडूची गणेशमूर्ती आणण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंडळांचे प्रमुख पदाधिकारी धनंजय बरदाडे यांनी सांगितले. यंदा स्थापनेची ७५ वर्षे साजरी करीत असलेली रंगारी बदक चाळ, पाटील इस्टेट (नाना चौक) सार्व. गणेशोत्सव मंडळ यांसह गिरगाव, विलेपार्ले, भांडुप अशा अनेक भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी असाच श्रीगणेशा केला आहे.
-
साभार - महाराष्ट्र टाइम्स

Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla