Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
विशेष बातम्या
सामुहीक आंतर्ज्ञाती विवाह
विशेष बातम्या
Friday, 20 June 2014 14:10

सामुहीक आंतर्ज्ञाती विवाह

येत्या रविवारी दि. २२ जून रोजी मुलुंड येथील कालिदास नाट्यमंदिरात एक वेगळ्या प्रकारचा सामुहिक आंतर्ज्ञाती विवाह सोहळा आयोजला आहे. वेगवेगळ्या ज्ञातीतील ५० जोडप्यांचा त्यांच्या त्यांच्या श्रद्धेला अनुसरून सामुहिक विवाह संपन्न करण्याचे आयोजले आहे.
हा सामुहिक विवाह 'नायर हितचिंतक समिती' तर्फे 'पितृवेदी' या सामाजिक संस्थेच्या संयोगाने आयोजित करण्यात येत आहे. सर्वसाधारणतः शहरी सहजीवनातील खूपशी तरुण जोडपी केवळ लग्नसमारंभावर करावा लागणारा खर्चाची रक्कम उभी करण्यास असमर्थ असल्यामुळे किंवा लग्नानंतर वेगळं राहायला घर नसल्यामुळे लग्न करायचा निर्णय पुढे ढकलत राहतात. आयोजकांपैकी श्री. प्रकाश पडीक्कल यांनी असे म्हटले आहे की, 'आम्ही केवळ लग्नसमारंभ आणि या शुभप्रसंगी लागणारा गोडधोडाचाच खर्च पेलणार नसून; यांच्यापैकी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या जोडप्यांचा कपडालत्ता, भांडीकुंडी आणि गरजेपुरत्या दागदागिन्यांचा भारसुद्धा हलका करण्याचे योजले आहे. लग्नप्रसंगा नंतरच्या कुठल्याची समारंभाचा खर्च त्या त्या जोडप्याने करायचा आहे.
सदर समारंभ सकाळी ०८:०० वाजता सुरु होऊन दुपारी साधारणपणे ०२:०० वाजता संपन्न होईल. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मी वर-वधू यात भाग घेणार आहेत. श्री. पडीक्कल यांच्या म्हणण्याप्रमाणे," या सोहळ्यात सामील होण्यासाठी इच्छुकांनी पाठविलेल्या प्रत्येक अर्जाची या आधीच नेमलेल्या समितीने कसून छाननी केलेली आहे. आमच्या सदस्य सभासदांनी या जोडप्यांच्या मूळ गांवी स्वतः भेट देऊन यांच्यापैकी कुणाचेही या आधी एकही लग्न न झाल्याची खातरजमा केलेली आहे. तसेच या जोडप्यातील प्रत्येकासाठी संपूर्ण सोहळ्याची तोंडओळख देखील घडवून आणलेली आहे.

 
मंदाकिनीसाठी भगिरथ प्रयत्न
विशेष बातम्या
Friday, 20 June 2014 14:08

मंदाकिनीसाठी भगिरथ प्रयत्न

जवळ जवळ एक वर्षाच्या अथक प्रयत्नांमुळे मंदाकीनीचा केदारनाथ येथील मूळ प्रवाह पुन्हा मार्गी लागलेला आहे. पं. नेहरू गिर्यारोहण संस्था आणि आय.आय.टी. रुरकीतील निवडक तज्ञ मंडळीनी, उत्तराखंड येथील गेल्या वर्षीच्या प्रलयानंतर बदललेला मंदाकिनी नदीचा प्रवाह पुन्हा तिच्या मूळ मार्गी आणून सोडला आहे.
चौराबारी येथील हिमनदीपासून उगम पावणाऱ्या मंदाकिनी नदीने या प्रलयानंतर स्वतःबरोबर टनावारी हिमकडे प्रवाह बरोबर आणून केदारनाथ येथे पायउतार होताना अक्षरशः हैदोस घातला. भीतीदायक पद्धतीने वाहणाऱ्या प्रपाताने केदारनाथ मंदिराला नेहमीप्रमाणे डाव्या बाजूने वळसा घालावयाच्या ऐवजी उजव्या बाजूने वळसा घालत अघटीत थैमान घातले. यातच स्वतःबरोबर सरस्वती नदीचा प्रवाहही कवेत घेऊन केदारनाथ मंदिरापासून केवळ २० मीटर अंतरावरून वाहायला सुरुवात केली.
गेल्या महिन्यात बर्फ वितळायला सुरुवात झाल्यावर राज्य शासनाने पं. नेहरू गिर्यारोहण संस्थेला, पावसाळ्यामुळे नदीने अधिकच रौद्र रूप धारण करायच्या आधी तिला तिच्या मूळ मार्गी आणून सोडण्यासाठी साकडे घातले.

 
भारताची कामगिरी चांगली झाली : धोनी
विशेष बातम्या
Tuesday, 18 February 2014 18:02

भारताची कामगिरी चांगली झाली : धोनी 

- - पीटीआय --Feb 18,2014

वेलिंग्टन : न्यूझीलंडच्या दौऱ्यामध्ये भारतीय संघाला पाच पराभव, एक 'टाय' आणि एक अनिर्णित असा निराशाजनक निकाल स्वीकारावा लागला असला, तरीही कर्णधार महेंद्रसिंह धोनी मात्र ही कामगिरी "चांगली' असल्याचे सांगत आहे. पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा 0-4 असा, तर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 0-1 असा पराभव झाला. आज (मंगळवार) संपलेली कसोटी अनिर्णित राखण्यात भारताला यश आले; मात्र या संपूर्ण दौऱ्यात भारताला एकही विजय मिळविता आला नाही. 

 

सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत धोनी म्हणाला, "एकूण गोळाबेरीज करता, संघाची कामगिरी चांगली झाली. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापासून आमची कामगिरी उंचावत आहे. या संघात अनेक दर्जेदार खेळाडू आहेत, हे आम्ही दाखवून दिले आहे. विशेषत:, कसोटी मालिकेमध्ये संघाची कामगिरी चांगली झाली. कारण, प्रतिकुल परिस्थितीमध्येही आम्ही झुंज दिली. पाटा खेळपट्ट्यांवर योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणे आवश्‍यक असते आणि आमच्या गोलंदाजांनी तेच केले.'' 

 

दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडला 192 धावांत गुंडाळून भारताने 246 धावांची आघाडीही घेतली होती. दुसऱ्या डावातही न्यूझीलंडची अवस्था पाच बाद 94 अशी झाली होती. मात्र, कर्णधार ब्रॅंडन मॅकलम आणि बी. जे. वॉटलिंग यांनी झुंज देत यजमान संघाला सामन्यावर पकड मिळवून दिली.

 
मोदींना मत म्हणजे अंबानींना मत- केजरीवाल
विशेष बातम्या
Tuesday, 18 February 2014 17:59

मोदींना मत म्हणजे अंबानींना मत- केजरीवाल

Feb 18,2014

- - वृत्तसंस्था

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना मत देणे म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मत देण्यासारखे आहे, असे आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

प्रसारमाध्यमांशी बोलताना केजरीवाल म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत 300 किंवा 350 जागांवर निवडणूक लढविणे हा आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाही. भ्रष्टाचारी नेत्यांना संसदेत जाण्यापासून रोखणे हा आमचा प्रमुख मुद्दा असणार आहे. स्वतः लोकसभा निवडणूक लढवेल अथवा नाही. परंतु, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध त्यांच्याच मतदार संघामध्ये जाऊन प्रचार करणार आहे.' 

कॉंग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष अंबानी यांचे चेहरे आहेत. देशात मोदींचे सरकार आल्यास पुढील पाच वर्षे अंबानी सरकार चालवतील. गेली दहा वर्षे अंबानीच युपीए सरकार चालवत आहेत, असेही केजरीवाल म्हणाले. 

ते पुढे म्हणाले, "दिल्लीमध्ये विधानसभा निवडणूक व लोकसभा निवडणूक एकाचवेळी आल्यास आपण विधानसभा निवडणूक लढविणार आहोत. परंतु, येथे कॉंग्रेस अथवा भाजप बरोबर सरकार बनविणार नाही.'

 
तेलंगण विधेयक लोकसभेत मंजूर
विशेष बातम्या
Tuesday, 18 February 2014 17:56

तेलंगण विधेयक लोकसभेत मंजूर

 Feb 18,2014

- - वृत्तसंस्था

नवी दिल्ली : वादग्रस्त वेगळ्या तेलंगणचे विधेयक अखेर आज (मंगळवार) लोकसभेमध्ये आवाजी मतदानाने मंजूर झाले. या विधेयकाला कडवा विरोध करणारे 'वायएसआर कॉंग्रेस'चे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांनी या निर्णयाचे वर्णन 'देशाच्या इतिहासातील काळा दिवस' असे केले असून उद्या राज्यव्यापी बंदचे आवाहनही त्यांनी केले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर आंध्र प्रदेशमध्ये कडक सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. 

आज लोकसभेमध्ये तेलंगणचे विधेयक मांडले जाणार असल्याची कल्पना असल्याने सकाळपासूनच सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली होती. या विधेयकावरील चर्चेदरम्यान लोकसभा टीव्हीवरील कामकाजाचे थेट प्रसारणही रोखण्यात आले होते. प्रचंड गोंधळात झालेल्या दिवसभराच्या कामकाजामध्येच तेलंगणच्या विधेयकावर आवाजी मतदान घेण्यात आले. भारतीय जनता पक्षानेही या विधेयकाला पाठिंबा दिला; मात्र वेगळ्या तेलंगणाला मान्यता देतानाच सीमांध्रसाठी पुरेसे आर्थिक पॅकेज देण्याची मागणीही भाजपने केली. 

हैदराबाद असेल संयुक्त राजधानी 

हैदराबाद ही केवळ तेलंगणची राजधानी असावी, ही खासदार असदुद्दीन ओवेसी यांची मागणी मतदानादरम्यान फेटाळली गेली. त्यामुळे पुढील दहा वर्षे तेलंगण आणि सीमांध्र या दोन्ही राज्यांसाठी हैदराबाद हीच राजधानी असेल. तेलंगण राज्यनिर्मितीला कडवा विरोध करणाऱ्या सीमांध्रच्या नेत्यांच्या समाधानासाठी केंद्राने या भागासाठी विशेष आर्थिक पॅकेज देण्याची घोषणाही केली. 

 
मरिन ड्राइववर अवतरले ‘राजपथ’
विशेष बातम्या
Sunday, 26 January 2014 10:46

मरिन ड्राइववर अवतरले ‘राजपथ’

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

लष्करी जवानांच्या चित्तथरारक कवायती, पोलिसांचे संलचन आणि राज्य सरकारच्या विविध खात्याच्या कार्याची माहिती सांगणारे विविधरंगी चित्ररथ यामुळे मरिन ड्राइववर आज जणू दिल्लीचे राजपथ अवतरले होते. दिल्लीच्या धर्तीवर मुंबईत मरिन ड्राइव्ह परिसरात आज, रविवरी प्रजासत्ताक दिनाचा संचलन सोहळा पार पडला. यात सेना दलाच्या तीनही सशस्त्र तुकड्या सहभागी झाल्या होत्या. देशात अशा प्रकारचा मान मिळणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.

राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी मरिन ड्राइववर ध्वजारोहण केले. भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरमधून या वेळी पुष्पवृष्टी करण्यात आली. संचलनात सहभागी झालेले वायुदल, सेनादल, नौदल आणि पोलीस दलाकडून राज्यपालांनी मानवंदना स्वीकारली. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अभिनेता सलमान खान उपस्थित होता.
या सोहळ्यात विविध २५ चित्ररथ सामिल झाले होते. मुंबई फर्स्ट संस्थेतर्फे मान्यवर व्यक्ती सहभागी असलेल्या व्हिंटेज कार रॅली या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरली. यावेळी मरिन ड्राइवच्या दोन्ही बाजुंनी बसलेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या रॅलीला दाद दिली. सैन्य दलातील सशस्त्र वाहने, फ्लॉय कॅचर रडार, डोग्रा, मार्चिंग युनिट, सेना दल बँड, नौदल बँड, वायुदलाचे पाचोरा मिसाइल, तटरक्षक दल, पोलिस दलाच्या कवायतींचा सहभाग होता. याशिवाय नौदलाच्या ५० नाविकांनी आपल्या बँड पथकासह हॉर्न पाइप डान्स केले. मुंबई पोलिस दलातर्फे मोटार सायकलींच्या चित्तथरारक कवायतींनी सर्वांचे लक्ष वेधले होते. आदिवासी संस्कृतीचे मनोहारी दृष्य यावेळी पाहायला मिळाले. दीडशेहून अधिक ढोल, १०० लेझिम आणि ४० इतर वाद्यांसह आदिवासी बांधव सहभागी झाले होते.

 
<< Start < Prev 1 2 3 4 Next > End >>

Page 3 of 4
Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla