Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
विशेष बातम्या
विठुरायाच्या दर्शनाची रांग आता ‘ऑनलाइन’ ….!
विशेष बातम्या
Saturday, 22 June 2013 18:50

विठुरायाच्या दर्शनाची रांग आता ‘ऑनलाइन’ ….!

vithu mauli-205x300पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्टाचे प्रमुख श्रद्धास्थान.दर वर्षी आषाढी-कार्तिकीला लाखो भाविक पंढरपूरांत दाखल होऊन विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात. ह्यावेळी होणाऱ्या गर्दीमुळे दर्शनासाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागते. यांच भाविकांची सोय म्हणून त्यांना सुलभ दर्शन घेता येण्यासाठी मंदिर समितीने एकवेबसाईट बनविली आहे. त्याद्वारे यंदाच्या आषाढी एकादशीपासून दर्शन घेता येणे शक्य आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्याचे विठ्ठल—रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी सांगितले. समितीची आषाढी नियोजन बैठक अध्यक्ष अण्णा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी रात्री झाली. त्या बैठीकीत त्यांनी हि माहिती दिली. www.vitthalrukminimandir.org संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले असून, याद्वारे पददर्शन नोंदणी करून दर्शनाचा लाभ घेणे शक्य होईल.

 
आधार कार्ड नोंदणीसाठी मुदतवाढ
विशेष बातम्या
Friday, 07 June 2013 04:30

आधार कार्ड नोंदणीसाठी मुदतवाढ

मुंबई शहर आणि उपनगरसह पुणे , नंदुरबार , वर्धा , अमरावती या सहा जिल्ह्यांतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जून महिन्यापर्यंत आधारकार्ड क्रमांक नोंदविणे सक्तीचे करण्यात आले होते. मात्र ' आधार ' नोंदणीच्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन या कर्मचाऱ्यांना एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आधार कार्डाची नोंदणी टप्याटप्प्याने सक्तीची करण्यात आली असून त्यात या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. वेतन मिळण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांनी किती सुट्ट्या घेतल्या आहेत , किती दिवस अर्धवेळ काम केले आहे याची सर्व माहिती सेवार्थ प्रणालीमध्ये असते. त्यामुळे वेतनाशी संबंधित असलेल्या सेवार्थ प्रणालीकडे कर्मचाऱ्यांनी आधारकार्ड क्रमांक जमा करावा यासाठी सक्ती करण्यात आली आहे. मात्र काही तांत्रिक अडचणी पाहता या सरकारी निर्णयास एक महिन्याची मुदत वाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

 
दहावी परीक्षेचा उद्या निकाल
विशेष बातम्या
Thursday, 06 June 2013 10:47

दहावी परीक्षेचा उद्या निकाल

म. टा. प्रतिनिधी , मुंबई  | 6th june 2013

१५ जूनला मिळणार मार्कलिस्ट  ,यंदापासून फेरतपासणीचीही सोय.

राज्यातील लाखो विद्यार्थी-पालकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरणारा दहावीचा निकाल शुक्रवारी , ७ जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारी जाहीर केले. बारावीप्रमाणे यंदा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही निकालाच्या फेरतपासणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read more...
 
विद्यापीठाने केली सर्व्हरच्या क्षमतेत वाढ
विशेष बातम्या
Thursday, 06 June 2013 10:50

विद्यापीठाने केली सर्व्हरच्या क्षमतेत वाढ

eSakal  |Tuesday, June 04, 2013

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशांसाठी ऑनलाईन नोंदणीत दोन दिवसांपासून तांत्रिक अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे सर्व्हरच्या क्षमतेवर ताण आला, असे कारण त्यासाठी देण्यात आले. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने (एमकेसीएल) आज सर्व्हरच्या क्षमतेत वाढ केल्याची माहिती विद्यापीठाच्या प्रशासनाने दिली. दरम्यान, आज सायंकाळपर्यंत 91 हजार 875 विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाली होती. ऑनलाईन नोंदणीची मुदत 7 जूनपर्यंत आहे.

Read more...
 
कोकण रेल्वेच्या वेळेत बदल
विशेष बातम्या
Thursday, 06 June 2013 10:53

कोकण रेल्वेच्या वेळेत बदल

Maharashtra Times | June 05, 2013

पावसाळ्यासाठीची उपाययोजना

दरवर्षी कोकणात कोसळणाऱ्या तुफान पावसामुळे यंदाही कोकण रेल्वेने पावसाळ्यात १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे . या कालावधीत मेल / एक्स्प्रेस पूर्वनियोजित वेळेपेक्षा अर्धा ते एक तास अगोदर सुटणार आहेत . नवे वेळापत्रक १० जूनपासून अंमलात येणार आहे .

Read more...
 
मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी दरेकर
विशेष बातम्या
Thursday, 06 June 2013 10:58

मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी दरेकर

Maharashtra Times |June 05, 2013 

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ( मुंबै बँक ) बुधवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी मनसेचे आमदार प्रवीण दरेकर आणि उपाध्यक्षपदी प्रकाश शिरवाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे .

Read more...
 
<< Start < Prev 1 2 3 4 Next > End >>

Page 4 of 4
Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla