Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
विशेष बातम्या
कारखरेदीसाठी बँकांकडून १०० टक्के कर्ज
विशेष बातम्या
Tuesday, 01 July 2014 11:13

कारखरेदीसाठी बँकांकडून १०० टक्के कर्ज

Jun 26, 2014
कॉर्पोरेट्सकडून असणारी वाहन कर्जाची मागणी घसरल्याने त्यांना आकर्षित करण्यासाठी काही खासगी बँकांनी कारखरेदीसाठी १०० टक्के कर्जाची सोय उपलब्ध करून दिली आहे.

Read more...
 
तंत्रशिक्षण अभ्यासक्रम होणार मराठीतून
विशेष बातम्या
Tuesday, 01 July 2014 11:12

तंत्रशिक्षण अभ्यासक्रम होणार मराठीतून

Jun 30, 2014

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तसेच इंग्रजीची भीती असलेल्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण अभ्यासक्रम अवघड जाऊ नयेत, यासाठी लवकरच तंत्रशिक्षण अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Read more...
 
पाणीपुरवठ्याचे डोंगराएवढे आव्हान
विशेष बातम्या
Tuesday, 01 July 2014 11:11

पाणीपुरवठ्याचे डोंगराएवढे आव्हान

महानगरपालिकेच्या संपूर्ण कामकाजावरच ताण येण्याची भीती
Jun 30, 2014

महापालिका हद्दीत नव्याने ३४ गावांचा समावेश करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे या नवीन गावातील नागरिकांना आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेवर असणार आहे. पालिका हद्दीत समाविष्ट होणाऱ्या गावांना पुरेसा आणि नियमीत पाणीपुरवठा करण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासनासमोर असणार आहे.

Read more...
 
पर्यटकांअभावी लोणावळा ओस
विशेष बातम्या
Tuesday, 01 July 2014 11:11

पर्यटकांअभावी लोणावळा ओस

Jun 30, 2014, 03.11AM IST

यंदा जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने पावसाळी पर्यावरणासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळा, खंडाळ्यात पर्यटकांची लगबग दिसून येत नसल्याचे चित्र आहे. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भुशी डॅमने तळ गाठला आहे. पाऊस गायब झाल्याने बळीराजा हतबल आणि चिंताग्रस्त झाला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार भातपेरणीचे संकट ओढविले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

Read more...
 
आकार १ इंचाचा, किंमत १ कोटी
विशेष बातम्या
Friday, 20 June 2014 14:12

आकार १ इंचाचा, किंमत १ कोटी

केवळ १ इंच आकाराच्या, १ सेंट मूल्याचे पोस्टाचे तिकीट जगातील अमुल्य किंमतीचे ठरले आहे. दक्षिण अमेरिकेतील एकोणीसाव्या शतकातील ब्रिटीश वसाहतीतील हे राणी रंग छटेत छापलेलं १ सेंट मूल्याचे पोस्टाचे तिकीट, सदबी या लिलावासाठी प्रसिद्ध असलेल्या संस्थेतर्फे न्यूयॉर्क येथील लिलावात दहा लाख रुपये किमतीत विकले गेले आहे.
या आधी नोंद असलेल्या लिलावात, १९९६ मध्ये पिवळ्या रंग छटेत छापलेल्या पोस्टाच्या तिकिटावर २.२ लाख रुपयाची बोली लावण्यात आलेली होती. १८५६ मधील गियानातील ब्रिटीश वसाहतीची एकमेव साक्षीदार असलेले हे १ सेंट मूल्याचे दुर्मिळ तिकीट गेलं शतकभर जगभरातल्या सर्व तिकीट संग्रहाचे मेरुमणी ठरलेलं आहे. आजपर्यंत लिलावात विकल्या गेलेल्या वजन आणि आकार या निकषांवर अत्यंत खर्चिक ठरण्याचा मान या वस्तूला मिळाला आहे.
१८७३ साली दक्षिण अमेरिकेत वास्तव्य असलेल्या एका १२ वर्षे वयाच्या स्कॉटीश मुलाच्या हाती हे तिकीट लागल्यापासून आजपर्यंत अगणित तिकीट संग्राहकांच्या हस्ते परहस्ते याचा प्रवास झालेला आहे. ब्रिटीश गियाना प्रदेश १९८६ पासून या वर्षीच्या सुरुवातीला लंडन येथील सद्बीच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनापर्यंत, जगाच्या दृष्टी आड होता. अगदी काल परवापर्यंत हा प्रदेश एका खुनी पण अमेरिकन अब्जाधीश जॉन ड्यू पाँट यांच्या अखत्यारीत होता.

 
उपवन की उभं-वन
विशेष बातम्या
Friday, 20 June 2014 14:11

उपवन की उभं-वन

मुंबई येथील इरला नाल्याचं अत्यंत घाणेरडं रूप झाकण्यासाठी कडेकडेने संपूर्ण कुंपणावर काटकोनात वर चढत जाणारी एक बाग उभारण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे उभारण्यात येणारा हा मुंबईतला पहिलाच उपक्रम असावा.

फुलझाडांच्या अक्षरशः हजारो कुंड्या एकावर एक एखाद्या फुलपाखराच्या आकारात रचून, हिरव्या आणि जांभळ्या रंगांच्या जवळ जवळ ३००० फुलझाडांची रचना करण्यात आलेली आहे. अंधेरी येथील नगरसेवक श्री. अमित साटम यांच्या पुढाकाराने, शांघाय येथील एका उपक्रमाने प्रेरित होऊन, साधारणतः १५ लाख रुपये खर्चाने ही बाग फुलवण्यात आलेली आहे.

बहुतकरून अशा प्रकारचा हा देशातील 'उभ्या-वनाचा' पहिलाच प्रयत्न असावा, असे श्री. साटम यांचे म्हणणे आहे.

 
<< Start < Prev 1 2 3 4 Next > End >>

Page 2 of 4
Facebook Image


place-to-visit  

 

 

 

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla